No edit permissions for मराठी

TEXT 60

svabhāva-jena kaunteya
nibaddhaḥ svena karmaṇā
kartuṁ necchasi yan mohāt
kariṣyasy avaśo ’pi tat

स्वभाव-जेन-स्वाभाविक; कौन्तेय-हे कुंतीपुत्र; निबद्धः-बद्ध; स्वेन-आपल्या; कर्मणा-कर्मे, कर्तुम्-करण्यासाठी; -नाही; इच्छसि-इच्छा केलीस; यत्-जे; मोहात्-मोहाने; करिष्यसि-तू करशील; अवशः-अनिच्छेने; अपि-सुद्धा; तत्—ते.

मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारीत आहेस; परंतु हे कौंतेया! तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील.

तात्पर्य: मनुष्याने जर भगवंतांच्या निर्देशानुसार कर्म करण्याचे नाकारले तर ज्या प्रकृतीच्या गुणात तो स्थित आहे त्या गुणानुसार त्याला कर्म करणे भाग पडेल. प्रत्येक मनुष्य हा प्राकृतिक गुणांच्या विशिष्ट मिश्रणाच्या वर्चस्वाखाली असतो आणि त्याप्रमाणे तो कर्म करीत असतो. परंतु जो स्वेच्छेने भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करतो तो गौरवान्वित होतो.

« Previous Next »