No edit permissions for मराठी

TEXT 7

niyatasya tu sannyāsaḥ
karmaṇo nopapadyate
mohāt tasya parityāgas
tāmasaḥ parikīrtitaḥ

नियतस्य-शास्त्रविहित कर्माचा; तु-परंतु; सन्यासः-त्याग; कर्मणः-कमांचा; -कधी नाही; उपपद्यते-योग्य असतो; मोहात्-मोहाने; तस्य-त्याचा; परित्यागः-त्याग; तामसः-तमोगुणी; परेकीर्तित:-घोषित केले जाते.

नियत कर्माचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते.

तात्पर्य: भौतिक सुखाकरिता करण्यात येणा-या कर्माचा त्याग केला पाहिजे. तथापि, ज्या कर्मामुळे आध्यात्मिक कार्यात प्रगती होते-उदाहरणार्थ, भगवंतांकरिता अन्न शिजविणे व त्याचा नैवेद्य दाखविणे आणि नंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे -अशा कर्माची शिफारस केलेली आहे. असे म्हटले जाते की, संन्याशाने स्वत:करिता अन्न शिजवू नये. स्वत:करिता अन्न शिजविण्यास प्रतिबंध असला तरी भगवंतांकरिता अन्न शिजविणे निषिद्ध नाही. तसेच, आपल्या शिष्याची कृष्णभावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न करू शकतो. जर कोणी अशा विहित कर्माचा त्याग केला तर तो तमोगुणी कर्म करीत आहे असे समजावे.

« Previous Next »