No edit permissions for मराठी

TEXT 6

etāny api tu karmāṇi
saṅgaṁ tyaktvā phalāni ca
kartavyānīti me pārtha
niścitaṁ matam uttamam

एतानि-ही सर्व; अपि-निश्चितच; तु—परंतुः कर्माणि-कर्मे: सङ्गम्—संगत; त्यक्त्वा-त्याग करून; फलानि-फले;-सुद्धा; कर्तव्यानि-कर्तव्य म्हणून केली पाहिजेत; इति-असे; मे-माझे, पार्थ—हे पार्थ, निश्चितम्—निश्चित, मतम्—मतः उत्तमम्—उत्तम.

ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ! ही कर्मे कर्तव्यबुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे.

तात्पर्यः सर्व यज्ञ जरी शुद्धीकरण करणारे असले तरी अशा यज्ञांपासून मनुष्याने फलाची अपेक्षा ठेवू नये. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, जीवनाच्या भौतिक विकासासाठी योजिलेल्या सर्व यज्ञांचा त्याग केला पाहिजे; परंतु ज्या यज्ञांमुळे अस्तित्व शुद्ध होते आणि आध्यात्मिक स्तरापर्यंत प्रगती होते अशा यज्ञांचा त्याग करू नये. कृष्णभावनेची प्राप्ती करून देणा-या कोणत्याही साधनाला उत्तेजन दिले पाहिजे. श्रीमद्‌भागतवतात सुद्धा म्हटले आहे की, भक्तियोगाला अनूकूल अशा कोणत्याही कर्माचा स्वीकार केला पाहिजे. धर्माची ही सर्वोच्च कसोटी आहे. भगवद्भक्ताने असे कोणतेही कर्म, यज्ञ किंवा दान स्वीकारले पाहिजे जे भगवद्भक्तीकरिता सहायक होईल,

« Previous Next »