No edit permissions for मराठी

TEXT 71

śraddhāvān anasūyaś ca
śṛṇuyād api yo naraḥ
so ’pi muktaḥ śubhāḻ lokān
prāpnuyāt puṇya-karmaṇām

श्रद्धा-वान्-श्रद्धावान; अनसूयः-द्वेष न करणारा; -आणि; शृणुयात्-श्रवण करतो; अपि-निश्चितपणे; यः-जो; नरः-मनुष्य; सः-तो; अपि-सुद्धा; मुक्तः-मुक्तः; शुभान्-शुभ; लोकान्—लोक; प्राप्नुयात्—तो प्राप्त करतो, पुण्य-कर्मणाम्—पुण्यवान जीवांचे.

आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो.

तात्पर्य: या अध्यायाच्या सदुसष्टाव्या श्लोकात भगवंतांनी त्यांचा द्वेष करणा-या लोकांना गीता सांगण्यास स्पष्टपणे प्रतिबंध केला आहे. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, भगवद्गीता ही केवळ भक्तांसाठीच आहे. परंतु काही वेळा असे घडते की, भगवद्भक्त हा सामूहिकरीत्या प्रवचन देत असतो आणि त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येक व्यक्ती हा भक्तच असेल अशी अपेक्षा नसते. असे लोक सामूहिक प्रवचन भरवितातच का? तर या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, जरी प्रत्येक मनुष्य हा भक्त नसला तरी, श्रीकृष्णांचा द्वेष न करणारेही अनेक लोक आहेत. श्रीकृष्ण हे भगवान आहेत यावर त्यांची श्रद्धाही असते. अशा लोकांनी जर प्रमाणित भगवद्भक्तांकडून श्रवण केले तर परिणामतः ते सर्व पापांपासून तात्काळ मुक्त होतात आणि त्यानंतर पुण्यवान व्यक्ती वास करीत असलेल्या ग्रहलोकांची प्राप्ती करतात. म्हणून भगवद्गीतेचे केवळ श्रवण केल्याने, जो मनुष्य शुद्ध होण्याचा प्रयत्न करीत नाही, त्यालाही पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारे भगवंतांचा विशुद्ध भक्त हा प्रत्येकाला सर्व पापांतून मुक्त होण्याची आणि भगवद्भक्त होण्याची संधी उपलब्ध करून देतो.

          सामान्यतः जे लोक पापमुक्त आहेत व जे सदाचारी आहेत ते सहजपणे कृष्णभावनेचा स्वीकार करतात. या श्लोकातील पुण्यकर्माणम शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. या शब्दावरून वेदांमध्ये सांगितलेल्या अश्वमेध यज्ञासारख्या महान यज्ञकर्माचा बोध होतो. जे भक्तिपरायण पुण्यवान जन आहेत, परंतु शुद्ध झालेले नाहीत त्यांना धुव महाराज निवास करीत असलेल्या ध्रुवलोकांची प्राप्ती होते. ध्रुव महाराज हे महान भगवद्भक्त आहेत आणि त्यांचा स्वतःचा विशेष असा ध्रुव नामक लोक आहे.

« Previous Next »