No edit permissions for मराठी

TEXT 76

rājan saṁsmṛtya saṁsmṛtya
saṁvādam imam adbhutam
keśavārjunayoḥ puṇyaṁ
hṛṣyāmi ca muhur muhuḥ

राजन्-हे राजन; संस्मृत्य-स्मरण करून; संस्मृत्य-स्मरण करून; संवादम्-संवाद; इमम्-हा; अद्भुतम्-अद्भुत; केशव-भगवान श्रीकृष्णांचा; अर्जुनयोः-आणि अर्जुन; पुण्यम्-पवित्र; हृष्यामि-मी हर्षित होत आहे; -सुद्धा; मुहुः मुहुः-पुनः पुन्हा,

हे राजन्! श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादांचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण, पुनः पुन्हा हर्ष होत आहे.

तात्पर्य: भगवद्गीतेचे ज्ञान इतके दिव्य आहे की, जो कोणी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद जाणतो तो पुण्यवान होतो आणि या संवादाचे त्याला कधीच विस्मरण होत नाही. हीच आध्यात्मिक जीवनाची दिव्य स्थिती आहे. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, जो मनुष्य योग्य मार्गाने अर्थात, प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करतो त्याला परिपूर्ण कृष्णभावनेची प्राप्ती होते. कृष्णभावनेच्या प्रभावामुळे मनुष्य अधिकाधिक प्रबुद्ध होत जातो आणि केवळ अल्प काळासाठीच नव्हे तर क्षणोक्षणी तो हर्षमय जीवनाचा आनंद घेतो.

« Previous Next »