No edit permissions for मराठी

TEXT 1

sañjaya uvāca
taṁ tathā kṛpayāviṣṭam
aśru-pūrṇākulekṣaṇam
viṣīdantam idaṁ vākyam
uvāca madhusūdanaḥ

सञ्जय: उवाच - संजय म्हणाला; तम्‌ - अर्जुनाला उद्देशून; तथा -याप्रमाणे; कृपया - करूणतेने; आविष्टम्‌ - व्याप्त झालेल्या ; अश्रु-पूर्ण-आकुल - अश्रूंनी पूर्ण भरलेल्या; ईक्षणम्‌- नेत्र; विषीदन्तम्‌ - शोकग्रस्त; इदम्‌ - हे; वाक्यम्‌ - शब्द, वचन; उवाच - म्हणाले; मधु-सूदन: - मधू दैत्याचा वध करणारे

संजय म्हणाला : कुरुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढीलप्रमाणे म्हणाले.

तात्पर्य : भौतिक करुणा, शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्यांबद्दलच्या असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत. सनात आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णांनी मधू दैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे त्या अज्ञानरुपी दैत्याचा श्रीकृष्णांनी वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती. करुणेचा उपयोग कुठे करावा हे काणालाही समजत नाही. बुडणार्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञानरुपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररुपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचविता येत नाही. जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. अर्जुन हा  क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती. परंतू भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्‌गीता सांगितली. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्मांप्रति अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो, त्यालाच या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे.

« Previous Next »