No edit permissions for मराठी

TEXT 25

avyakto ’yam acintyo ’yam
avikāryo ’yam ucyate
tasmād evaṁ viditvainaṁ
nānuśocitum arhasi

अव्यक्त:-अदृश्य, अव्यक्त: अयम्- हा आत्मा; अचिन्त्य:- अकल्पनीय; अयम्- हा आत्मा; अविकार्य:- अविकारी किंवा अपरिवर्तनीय; अयम्- हा आत्मा; उच्यते- म्हटले जाते; तस्मात्-म्हणून; एवम्-याप्रमाणे; विदित्वा-योग्य रीतीने जाणून; एनम्-हा आत्मा; -नको; अनुशोचितुम्-शोक करणारा; अर्हसि-योग्य आहेस.

हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते, हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस.

ताप्तर्य: पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की, अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. यास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरीत्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपणाला या सत्याचा स्वीकार केला पाहिजे. कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे वेदाध्यायनाशिवाय आत्मज्ञानप्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्यप्राय आहे. आत्मा म्हणजेच चेतना आणि चेतन आहे व हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात तशी आत्म्यामध्ये आढळून येत नाहीत. आत्मा हा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अणुरुपच राहतो. परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्मरूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा, परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्याशी कधीही बरोबरी करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पेनचा वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो.

« Previous Next »