No edit permissions for मराठी

TEXT 38

sukha-duḥkhe same kṛtvā
lābhālābhau jayājayau
tato yuddhāya yujyasva
naivaṁ pāpam avāpsyasi

सुख-सुख; दु:खे- आणि दु:ख; समे-समभावाने; कृत्वा- करून; लाभ-अलाभौ- लाभ आणि हानी; जय-अजये-जय आणि पराजय; तत:-त्यानंतर; युद्धाय-युद्ध करण्याकरिता; युज्यस्व-तयार हो; -कधीही नाही; एवम्- अशा रीतीने; पापम् - पापकर्म; अवाप्स्यसि- प्राप्त करशील.

सुख अथवा दु:ख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, कारण ही त्यांची इच्छा आहे. कृष्णभावनाभावित कार्यांमध्ये सुख अथवा दु:ख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचरांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णंसाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे. कारण त्यामुळे भौतिक कार्ये बंधनास कारणीभूत होत नाहीत. जो आपल्या इंद्रियतृप्तीकरिता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात अडकावे लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्णभावनाभावित कार्यामध्ये स्वत:ला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला, सामान्यतया कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे, कोणच्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणीही रहात नाही. असे सांगितले जाते की,

देवर्षिभूतात्पनृणां पितृणां न किङ्करो नायमृणी च राजन् ।
सर्वात्मना य: शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तम् ।

     ‘‘इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद, श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहात नाही. तसेच तो देवदेवता, ऋषिमुनी, मानवसमाज, नातलग, मानवता किंवा पितर इत्यादींचे ऋण त्याच्यावर राहात नाही.’’ (श्रीमद्भागवत 11.5.41) हाच संकेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्‍लोकात दिला आहे आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्‍लोकात केले जाईल.

« Previous Next »