No edit permissions for मराठी

TEXT 37

hato vā prāpsyasi svargaṁ
jitvā vā bhokṣyase mahīm
tasmād uttiṣṭha kaunteya
yuddhāya kṛta-niścayaḥ

हत:-मारला गेल्यावर; वा- अथवा; प्राप्स्यासि-तू प्राप्त करशील; स्वर्गम्- स्वर्गलोक; जित्वा- विजयी होऊनी; वा- किंवा; भोक्ष्यसे-तू भोगशील; महीम्- पृथ्वी; तस्मात्- म्हणून; उत्तिष्ठ- ऊठ; कौन्तेय- हे कौंतेय (कुंतीपुत्र) ; युद्धाय- युद्धासाठी; कृत- दृढ; निश्चय:- निश्चितपणे.

हे कौंतेया! रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभागेशील. म्हणून दृढनिश्‍चयी होऊन ऊठ आणि युद्ध कर.

तात्पर्य: अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते. कारण युद्धात मारला गेल्यानेही त्याला स्वर्गलोकाप्रत उन्नत होता आले असते.

« Previous Next »