No edit permissions for मराठी

TEXT 4

arjuna uvāca
kathaṁ bhīṣmam ahaṁ saṅkhye
droṇaṁ ca madhusūdana
iṣubhiḥ pratiyotsyāmi
pūjārhāv ari-sūdana

अर्जुन: उवाच - अर्जुन म्हणाला; कथम्-कसे; भीष्मम्-भीष्म; अहम् -मी; सङ्ख्ये-युद्धामध्ये; द्रोणम् -द्रोण; -सुद्धा; मधु-सूदन -हे मधुसूदन; इषुभि:- बाणाद्वारे; प्रतियोत्स्यामि- उलट प्रहार करू; पूजा-अहौं-जे पूजनीय आहेत त्यांना; अरि-सूदन- हे शत्रुसंहारक, अरिसूदन

अर्जुन म्हणाला : हे अरिसूदन! हे मधुसूदना! मला पूजनीय असणार्‍या भीष्म, द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन?

तात्पर्य : पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की, ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वादसुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे कसे काय शक्य आहे? आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधी तरी आक्रमण करू शकतील काय? अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत.

« Previous Next »