TEXT 5
gurūn ahatvā hi mahānubhāvān
śreyo bhoktuṁ bhaikṣyam apīha loke
hatvārtha-kāmāṁs tu gurūn ihaiva
bhuñjīya bhogān rudhira-pradigdhān
गुरुन्- ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरुजन; अहत्वा - हत्या न करता; हि- निश्चितच; महा-अनुभवान्- महात्म्यांना; श्रेय:-श्रेयस्कर; भोक्तुम- जीवनाचा उपभोग घेणे; भैक्ष्यम्-भिक्षा मागून; अपि-जरी; इह-या जीवनामध्ये; लोके - या जगात; हत्वा - हत्या करून; अर्थ - प्राप्ती; कामान्- इच्छेने; तु -पण; गुरुन् - ज्येष्ठ व्यक्तींना; इह-या जगतात; एव-निश्चितपणे; भुञ्जीय-भोगावेच लागेल; भोगान् -भोग्य वस्तू; रूधिर-रक्ताने; प्रदिग्धान् - माखलेले, रंजित.
महात्मासम असणार्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जागणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील.
तात्पर्य : धर्मग्रंथातील नियमांनुसार जो गुरु निंद्यकर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे, केवळ आर्थिक साहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांना गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती; पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की, ते सर्वजण त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपयोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे.