No edit permissions for मराठी

TEXT 56

duḥkheṣv anudvigna-manāḥ
sukheṣu vigata-spṛhaḥ
vīta-rāga-bhaya-krodhaḥ
sthita-dhīr munir ucyate

दु:खेषु-त्रिविध दु:खांत; अनुद्विग्न-मना:- मनात क्षुब्धता होऊ न देता; सुखेषु - सुखामध्ये; विगत-स्पृह:- आस्था न ठेवता;वीत- पासून मुक्त ; राग- आसक्ती; भय-भय; क्रोध:- आणि क्रोध; स्थित - धी:- ज्याचे मन स्थिर आहे; मूनि:- मुनी; उच्यते - म्हटले जाते.

जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्हासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यंापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते.

तात्पर्य : मुनि शब्द दर्शवितो की,जो मानसिक तर्कवितर्कासाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. असे सांगितले जाते की, प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोण असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. न चासावृषिर्यस्य मतं न भिन्नम् (महाभारत, वनपर्व 313.117) पण या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितधी: मुनी हा साधारण मुनींपेक्षा वेगळा आहे. स्थितधी: मुनी हा नेहमी कृष्णभावनाभावित असतो कारण कलात्मक तर्कवितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो.त्याल प्रशान्त नि:शेष मनोरथान्तर (स्तोत्र रत्न 43) असे म्हटले जाते. म्हणजेच ज्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केली आहे व जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहेत या अंतिम निर्णयाप्रत आलेला असतो. (वासुदेव: सर्वामिती स महात्मा सुदुर्लभ:) त्याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते. असा पूर्णपणे कृष्णभावनाभावित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघातांनी मुळीच क्षुब्ध होत नाही. कारण तो सर्व दु:खांचा भागवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो. त्याला वाटते की,आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपण केवळ आणखी त्रासासाठीच लायक आहोत तरीसुद्धा भगवंतांच्या कृपेने आपले कष्ट हे कमीत कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांना देतो. कारण त्याला वाटते की, आपण त्या सुखाला अपात्र आहोत. तो निश्चितपणे जाणतो की, केवळ भगवंतांच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत राहनू आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंतांच्या सेवेप्रीत्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. आसक्ती म्हणजे स्वत:च्या इंद्रियतृप्तीकरिता गोष्टींचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रियासक्तीचा अभाव होय. पण जो कृष्णभावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तही नाही किंवा अनासक्तीही असत नाही, कारण त्याचे जीवन हे भगवत्सेवेमध्ये समर्पित असते. यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा अपयश, कृष्णभावनाभावित मनुष्य हा नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो.

« Previous Next »