No edit permissions for मराठी

TEXT 68

tasmād yasya mahā-bāho
nigṛhītāni sarvaśaḥ
indriyāṇīndriyārthebhyas
tasya prajñā pratiṣṭhitā

तस्मात्- म्हणून ; यस्य - ज्याची; महा-बाहो- हे महाबाहू; निगृहीतानि- याप्रमाणे नियंत्रित केलेली; सर्वश:-सर्व बाजूंनी पूर्णतया; इन्द्रियाणि- इंद्रिये; इन्द्रिय-अर्थेभ्य:- इंद्रियविषयांपासून, तस्य- त्याची; प्रज्ञा- बुद्धी; प्रतिष्ठिता- स्थिर.

म्हणून हे महाबाहू ! ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते

तात्पर्य : केवळ कृष्णभावेनद्वारे किंवा सर्व इंद्रियांना भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रियतृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे. ज्याप्रमाणे प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता येते त्याप्रमाणे इंद्रियेही नियंत्रित केली जाऊ शकतात; पण मानवी प्रयत्नाद्वारे नव्हे तर केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतात. ज्याने जाणले आहे की, केवळ कृष्णभावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे त्याला साधक किंवा मोक्षप्राप्तीकरिता योग्य असा परीक्षार्थी म्हटले जाते.

« Previous Next »