No edit permissions for मराठी

TEXT 22

na me pārthāsti kartavyaṁ
triṣu lokeṣu kiñcana
nānavāptam avāptavyaṁ
varta eva ca karmaṇi

-नाही; मे-माझे; पार्थ- हे पृथापुत्रा; अस्ति-आहे; कर्तव्यम्-कर्तव्य किंवा विहित कर्म; त्रिषु-तिन्ही; लोकेषु-लोकांमध्ये; किञ्चन- काहीसुद्धा; -काहीच नाही; अनवाप्तम्-गरज आहे; अवाप्तव्यम्-प्राप्त करण्यालायक; वर्ते-मी करीत आहे; एव-निश्चितच; -सुद्धा; कर्मणि- नियत कर्मामध्ये

हे पार्थ! या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही, मला कशाची उणीव नाही तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो.

तात्पर्य: वेदांमध्ये श्रीभगवान यांचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे

तमीश्वराणां परमं महेश्वरं तं देवतांना परमं च दैवतम्।
पतिं पतीनां परमं परस्ताद् विदाम देवं भुवेनशमीङ्यम ॥

न तस्य कार्य करणं च विद्यते न तत्समश्चाभ्यधिकश्चव दृश्यते।
परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया च ॥

     ‘‘परमेश्‍वर हे इतर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येकजण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत, जीव स्वत:हून श्रेष्ठ नाहीत. ते सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आहेत आणि ते सर्व नियत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारा पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत.

     भगवंतांच्या शरीराचे  स्वरुप सामान्य जीवासारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिये दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्याबरोबरचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमाप्रमाणे घडत जाते.’’ (शेताश्‍वतरोपनिषद् 6.7.-8)

     भगवंतांमध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्‍वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्रीभगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. जो मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे. त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच, पण ज्याला  तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करावयाचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते. तरीसुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत आहेत. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी हे शास्त्रनियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत.

« Previous Next »