No edit permissions for मराठी

TEXT 23

yadi hy ahaṁ na varteyaṁ
jātu karmaṇy atandritaḥ
mama vartmānuvartante
manuṣyāḥ pārtha sarvaśaḥ

यदि-जरी; हि-निश्चितच; अहम्-मी; -नाही; वर्तेयम्-या प्रकारे आचरण; जातु-केव्हाही; कर्मणि-विहित कर्मांचे पालन करण्यामध्ये; अतन्द्रिय:- काळजीपूर्वक किंवा सावधान होऊन; मम-माझे; वर्त्म-मार्ग; अनुवर्तन्ते-अनुसरण करतील; मनुष्या:- सर्व मनुष्य; पार्थ-हे पृथापुत्रा; सर्वश:- सर्व प्रकारे.

कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ! सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील.

तात्पर्य: आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जरी असे नीतिनियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्मांचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिह्नांचे अनुसरण केले असते. श्रीमद्भागवतावरून आपल्याला समजते की, भगवान श्रीकृष्ण, गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करीत होते.

« Previous Next »