No edit permissions for मराठी

TEXT 28

tattva-vit tu mahā-bāho
guṇa-karma-vibhāgayoḥ
guṇā guṇeṣu vartanta
iti matvā na sajjate

तत्व-वित्- परम सत्य जाणणारा; तु-परंतु; महा-बाहो-हे महाबाहू अर्जुन; गुण-कर्म-भौतिक प्रभावाखाली करण्यात आलेली कर्मे; विभागयो:-भेद; गुणा:- इंद्रिये; गुणेषु- इंद्रियतृप्तीमध्ये; वर्तन्ते- रत होतात; इति-याप्रमाणे; मत्वा-मानून; -कधीच नाही; सज्जते-आसक्त होतो.

हे महाबाहू अर्जुन! ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रियतृप्तीमध्ये रममाण होत नाही कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो.

तात्पर्य: परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. तो जाणतो की, आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अशं आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये. आपण स्वरुपत: सच्चिदानंद भगवंतांचे अंश आहोत आणि कोणत्या तरी कारणास्तव आपण सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत. त्याच्या विशुद्ध स्वरुपात त्याला आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावयाची असतात. म्हणून तो स्वत:ला कृष्णभावनाभावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि आनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो. जो जाणतो की, आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंतांच्या परमनियंत्रणाखाली आहे म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवद्कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो. श्रीमद्भागवताप्रमाणे जो परम सत्य, ब्रह्म, परमात्मा पुरुषोत्तम आणि श्रीभगवान या तीन विविध स्वरुपांना जाणतो, त्याला तत्ववित्त् म्हटले जाते, कारण त्याला परम सत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते.

« Previous Next »