No edit permissions for मराठी

TEXT 38

na hi jñānena sadṛśaṁ
pavitram iha vidyate
tat svayaṁ yoga-saṁsiddhaḥ
kālenātmani vindati

-कधीच नाही; हि-निश्‍चितपणे; ज्ञानेन-ज्ञानाबरोबर; सद्दशम्-तुलनेमध्ये; पवित्रम्-पवित्र; इह-या जगतामध्ये; विद्यते-अस्तित्वात आहे; तत्-ते; स्वयम्-आपोआप; योग-भक्तीमध्ये; संसिद्ध:- जो सिद्ध झाला आहे; कालेन-योग्यसमयी; आत्मनि-स्वत:मध्ये; विन्दति-आस्वादन करतो.

या जगात, दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्यसमयी, स्वत:मध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो.

तात्पर्य: आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान आहे हे जाणले पाहिजे. म्हणून दिव्य ज्ञानाइतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे. हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे. मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही, कारण तो स्वत:च्याच ठायी शांतीचा आनंद घेत असतो. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, हे ज्ञान आणि शांती यांची परिणती कृष्णभावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे.

« Previous Next »