No edit permissions for मराठी

TEXT 39

śraddhāvāḻ labhate jñānaṁ
tat-paraḥ saṁyatendriyaḥ
jñānaṁ labdhvā parāṁ śāntim
acireṇādhigacchati

श्रद्धा-वान्-श्रद्धावान मनुष्य; लभते-प्राप्त करतो; ज्ञानम्-ज्ञान; तत्-पर:- यामध्ये जो अत्यंत आसक्त आहे; संयत-संयमित; इन्द्रिय:- इंद्रिये; ज्ञानम्-ज्ञान; लब्ध्वा-प्राप्त करून; पराम्- दिव्य; शान्तिम्-शांती; अचिरेण-लौकरच; अधिगच्छति-प्राप्त होतो.

जो श्रद्धवान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत. तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लौकरच प्राप्त होते.

तात्पर्य: ज्याचा श्रीकृष्णांवर दृढ विश्‍वास आहे तोच श्रद्धावान मनुष्य असे कृष्णभावनाभावित ज्ञान प्राप्त करू शकतो. ज्याला वाटते की, केवळ कृष्णभावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती करू शकतो, त्याला श्रद्धावान मनुष्य म्हटले जाते. अशी दृढ श्रद्धा, भक्तिपूर्ण सेवा केल्याने आणि हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम राम राम हरे हरे या हृदयातील भौतिक मळ स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते. या व्यतिरिक्त मनुष्याने आपली इंद्रिये संयमित करणे आवश्यक आहे. ज्या मनुष्याची भगवान श्रीकृष्णांवर दृढ श्रद्धा आहे आणि ज्याने इंद्रियनिग्रह केला आहे, त्याला विनाविलंब कृष्णभावनेच्या ज्ञानाची पूर्णता प्राप्त करता येते.

« Previous Next »