No edit permissions for मराठी

TEXT 37

yathaidhāṁsi samiddho ’gnir
bhasma-sāt kurute ’rjuna
jñānāgniḥ sarva-karmāṇi
bhasma-sāt kurute tathā

यथा-ज्याप्रमाणे; एधांसि-सरपण; समिद्ध:- प्रदीप्त; अग्नि:- अग्नी; भस्म-सात्-भस्मसात; कुरुते-करतो; अर्जुन-हे अर्जुना; ज्ञान-अग्नि:- ज्ञानरुपी अग्नी; सर्व-कर्माणि-सर्व कर्मबंधने; भस्म-सात्-भस्मसात; कुरुते-करतो; तथा-त्याचप्रमाणे

ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुन! ज्ञानरुप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो.

तात्पर्य: आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधाच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्नीशी करण्यात आली आहे. हा अग्नी केवळ पापकर्माची फळेच भस्मसात करतो असे नाही तर तो पुण्यकर्माची फळेदेखील भस्मसात करतो. कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत. कर्म करताना होणारे बंधन, वर्तमान स्थितीत फलप्राप्ती ज्यांची होते ते बंधन पूर्वीच फलप्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फल देणारे बंधन; परंतु जीवाला स्वरूपावस्थेचे ज्ञान झाले म्हणजे ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते. जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्यांच्या संचित व क्रियमाण कर्मांची सर्व बंधने भस्मसात होतात. वेदांमध्ये (बृहद्-आरण्यक उपनिषद 4.4.22) म्हटले आहे की, उभे उहैवैषएते तरत्यमृत: साध्वसाधूनी-‘‘मनुष्य, पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो.’’

« Previous Next »