No edit permissions for मराठी

TEXT 11

kāyena manasā buddhyā
kevalair indriyair api
yoginaḥ karma kurvanti
saṅgaṁ tyaktvātma-śuddhaye

कायेन-शरीराद्वारे; मनसा-मनाद्वारे; बुद्ध्या-बुद्धीद्वारे; केवलै:- शुद्ध; इन्द्रियै:-इंद्रियांद्वारे; अपि-जरी; योगिन:-कृष्णभावनाभावित व्यक्ती; कर्म-कर्मे; कुर्वन्ति-ते करतात; सङ्गम्-आसक्ती; त्यक्त्वा-त्याग; आत्म-आत्म्याची; शुद्धये-शुद्धीकरणासाठी

योगिजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनीसुद्धा, केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात.

तात्पर्य: जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ कर्म करतो, तेव्हा त्याने शरीर, मन, बुद्धी किंवा इंद्रियांद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मषांपासून शुद्ध होते. कृष्णभावनाभावित मनुष्याने केलेल्या कर्मांपासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही. म्हणून शुद्ध कर्मे, ज्यांना सामान्यत: सदाचार म्हटले जाते ती कर्मे कृष्णभावनाभावित झाल्याने सहजपणे करता येतात. श्रील रुप गोस्वामी आपल्या भक्तिरसामृतसिंधूमध्ये (1.2.187) याबद्दल पुढीलप्रमाणे सांगतात.

ईहा यस्य हरेर्दास्ये कर्मणा मनसा गिरा।
निखिलास्वप्यवस्थासु जीवन्मुक्त: स उच्यते॥

     ‘‘आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वाणीने कृष्णभावनाभावित मनुष्य (श्रीकृष्णांच्या सेवेप्रीत्यर्थ कर्म करणारा) या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसरिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो.’’ त्याला मिथ्या अहंकार नसतो, कारण आपण म्हणजे हे शरीर नाही तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्‍चितपणे जाणतो. तो जाणतो की, हे शरीर आपले नाही. तो स्वत: तसेच त्याचा देहसुद्धा श्रीकृष्णांच्याच मालकीचा असतो. जेव्हा तो शरीर, मन, बुद्धी, वाचा, जीवन, संपत्ती इत्यादी गोष्टीद्वारे निर्मित आपल्याकडील सर्व वस्तू, श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो. तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्मबुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो. हीच कृष्णभावनेची पूर्णावस्था आहे.

« Previous Next »