No edit permissions for मराठी

TEXT 14

na kartṛtvaṁ na karmāṇi
lokasya sṛjati prabhuḥ
na karma-phala-saṁyogaṁ
svabhāvas tu pravartate

-कधीच नाही; कर्तुत्वम्-स्वामित्व; -नाही; कर्माणि-कर्मे; लोकस्य-लोकांची; सृजति-निर्माण करतो; प्रभु:-देहरुपी नगराचा स्वामी; -नाही; कर्म-फल-कर्मफलांचा; संयोगम्- संबंध; स्वभाव:-प्रकृतीचे गुण; तु-परंतु; प्रवर्तते-कार्य करतात.

देहरुपी नगराचा स्वामी, देहधारी जीव हा कर्मांची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते.

तात्पर्य- सातव्या अध्यायात सांगितले जाईल की, जीव हे भगवंतांची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहेत आणि ते भगवंतांच्या अपरा किंवा कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत. कोणत्या तरी कारणास्तव परा प्रकृतीरूप जीव, अनादी कालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहेत. जीवाने  प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे, विविध प्रकारच्या कर्मांचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते. अशा बद्धावस्थेत राहिल्याने, जीव अज्ञानामुळे स्वत:चे शरीराशी तादात्म्य करून शरीराच्या कर्मांची फळे भोगतो. अनादी कालापासून प्राप्त केलेले अज्ञान हेच शरीराच्या दु:ख -क्लेशांना कारणीभूत असते. ज्याक्षणी जीव शारीरिक कर्मांपासून अलिप्त होतो तत्क्षणी तो कर्मफलांतूनही मुक्त होतो. जोपर्यंत तो देहरुपी नगरात असतो तोपर्यंत तो देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो; परंतु वस्तुत: तो देहाच्या कर्मांचा आणि कर्मफलांचा स्वामीही नसतो किंवा नियंत्रकी नसतो. तो तर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. भवसागराच्या लाटा त्याला इतस्त: भिरकावीत असतात आणि त्या लाटांवर जीवाचे मुळीच नियंत्रण नसते. जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्णभावनेच्या साहाय्याने पाण्याबाहेर येणे होय. केवळ ही दिव्य कृष्णभावनाच त्याचे भ्रमापासून रक्षण करील.

« Previous Next »