No edit permissions for मराठी

TEXT 19

ihaiva tair jitaḥ sargo
yeṣāṁ sāmye sthitaṁ manaḥ
nirdoṣaṁ hi samaṁ brahma
tasmād brahmaṇi te sthitāḥ

इह-या जीवनामध्ये; एव-निश्‍चितच; तै:-त्यांनी; जित:-विजय प्राप्त केला आहे; सर्ग:-जन्म आणि मृत्यू; येषाम्-ज्यांचे; साम्ये-समानतेमध्ये; स्थितम्-स्थित आहे; मन-:- मन; निर्दोषम्-निर्दोष; हि-निश्‍चितच; समम्-समानता; ब्रह्म-ब्रह्माप्रमाणे; तस्मात्-म्हणून; ब्रह्माणि-ब्रह्मामध्ये; ते-ते; स्थित:-स्थित आहेत.

ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात.

तात्पर्य: वर उल्लेख केल्याप्रमाणे मनाची साम्यावस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराचे लक्षण आहे. ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केली आहे, त्यांनी भौतिक बंधने, विशेषत: जन्म आणि मृत्यू यावर विजय प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य या देहाशी तादात्म्य करतो तोपर्यंत त्याला बद्ध समजले जाते, परंतु जेव्हा तो आत्मसाक्षात्काराद्वारे साम्यावस्थेप्रत उन्नत होतो तेव्हा तो बद्ध जीवनातून मुक्त होतो. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, त्याला भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही तर तो मृत्यूनंतर आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो. अशा व्यक्ती पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे आणि अशा व्यक्तींच्या लक्षणांचे वर्णन खाली करण्यात आले आहे.

« Previous Next »