No edit permissions for मराठी

TEXT 6

sannyāsas tu mahā-bāho
duḥkham āptum ayogataḥ
yoga-yukto munir brahma
na cireṇādhigacchati

सन्न्यास्त:- संन्यासाश्रम; तु-परंतु; महा-बाहो-हे महाबाहो; दु:खम्-दु:ख; आप्तुम्-मनुष्याला प्रभावित करते; अयोगत:-भक्तियोगाच्या अभावी; योग-युक्त:- भक्तियोगामध्ये संलग्न असणारा; मुनि:-चिंतक किंवा मुनी; ब्रह्म-ब्रह्म; चिरेण-विनाविलंब; अधिगच्छति-प्राप्त करतो.

भगवद्भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो.

तात्पर्य: संन्याशांचे दोन प्रकार आहेत. मायावादी संन्यासी हे सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात तर वैष्णव संन्यासी हे. वेदान्त सूत्रावरील यथार्थ भाष्य असणाऱ्या भागवत तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात. मायावादी संन्यासीसुद्धा वेदान्त सूत्रांचेच अध्ययन करीत असतात, पण ते स्वत:च्या, शंकराचार्य कृत शारीरक भाष्याचा उपयोग करतात. भागवतपंथी विद्यार्थी हे पाञ्चरात्रिकी विधीनुसार भगवद्भक्तीमध्ये युक्त असतात. म्हणून भगवत्सेवेप्रीत्यर्थ वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये संलग्न असतात. वैष्णव संन्याशांना भौतिक कार्यांशी मुळीच देणेघेणे नसते आणि तरीही ते आपल्या भगवद्भक्तीमतध्ये विविध प्रकारची कार्ये करीत असतात. परंतु सांख्य, वेदान्त आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवद्भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत. त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्याकारणाने ते कधी कधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय श्रीमद्भागवताचा आश्रय घेतात. यास्तव त्यांचे श्रीमद्भागवताचे अध्ययनही कष्टप्रद होते. शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्याशांसाठी व्यर्थच असते. भगवद्भक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपली दिव्य कर्तव्ये पार पाडण्यात आनंदी असतात आणि भगवद्धामातील अंतिम प्रवेशाची त्यांनी निश्चिती असते. मायावादी संन्याशांचे कधी कधी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतन होते आणि ते पुन्हा भौतिक स्वरुपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यांमध्ये संलग्न होतात. म्हणून निष्कर्ष हाच आहे की, कृष्णभावनाभावित कर्मांमध्ये मग्न असलेले लोक हे, ब्रह्म म्हणजे काय?  याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्याशांपेक्षा श्रेष्ठ आहेत. मायावादी संन्यासी हे अनेकानेक जन्मांनंतर कृष्णभावनेमध्ये येतात.

« Previous Next »