No edit permissions for मराठी

TEXT 5

yat sāṅkhyaiḥ prāpyate sthānaṁ
tad yogair api gamyate
ekaṁ sāṅkhyaṁ ca yogaṁ ca
yaḥ paśyati sa paśyati

यत्-जे; साङ्ख्यै:-सांख्य तत्वज्ञानाद्वारे; प्राप्यते-प्राप्त होते; स्थानम्-स्थान; तत्-ते; योगै:- भक्तियोगाद्वारे; अपि-सुद्धा; गम्यते-मनुष्य प्राप्त करू शकतो; एकम्-एक; साङ्ख्यम्-सांख्य; -आणि; योगम्-भक्तियुक्त कर्म; -आणि; य:-जो; पश्यति-पाहतो; स:-तो; पश्यति-यथार्थपणे पाहतो.

जो जाणतोकी, सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवद्‌भक्तीद्वारे प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्ययोग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय.

तात्पर्य- तत्वसंशोधनाचा वास्तविक हेतू, जीवनाच्या परम ध्येयाचा शोध घेणे हा आहे. जीवनाचे अंतिम ध्येय आत्म-साक्षात्कार असल्यामुळे, दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य या निष्कर्षाप्रत येतो की, जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे. परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत. जेव्हा तो कृष्णभावनापरायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरुपस्थितीमध्ये स्थित असतो. सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्णभावनाभावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. वास्तविकपणे, जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत. प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जो हे पाहतो, तो सर्व गोष्टींना यथार्थरूपामध्ये पाहतो.

« Previous Next »