No edit permissions for मराठी

TEXT 29

sarva-bhūta-stham ātmānaṁ
sarva-bhūtāni cātmani
īkṣate yoga-yuktātmā
sarvatra sama-darśanaḥ

सर्व-भूत-स्थम्—सर्व प्राण्यांत स्थित: आत्मानम्—परमात्मा; सर्व—सर्व, भूतानि—जीव; — सुद्धा; आत्मनि-आत्म्यामध्ये; ईक्षते-पाहतो; योग-युक्त-आत्मा-कृष्णभावनाभावित मनुष्य; सर्वत्र-सर्वत्र; सम-दर्शनः-समभावनेने पाहणारा.

वास्तविक योगी, सर्व प्राणिमात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणिमात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निःसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला (भगवंतांना) सर्वत्र पाहते. तात्पर्य:

तात्पर्य: कृष्णभावनाभावित योगी हा परिपूर्ण द्रष्टा असतो, कारण तो परब्रह्म श्रीकृष्णांना, परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्याचे पाहतो. ईश्वरः सर्वांभूतानां हृद्देशेऽङ्जुन तिष्ठति. भगवंत आपल्या परमात्मा रूपात कुत्रा आणि ब्राह्मण दोघांमध्येही वास करतात. परिपूर्ण योगी जाणतो की, भगवंत हे नित्य दिव्यच असतात ते कुत्र्यामध्ये योगी जाणतो की, भगवंत हे नित्य दिव्यच असतात आणि ते कुत्र्यामध्ये वास करोत अथवा ब्राह्मणामध्ये वास करोत, भौतिक प्रकृतीने ते प्रभावित होत नाहीत. हीच भगवंतांची परमसमदृष्टी होय. स्वतंत्र आत्माही प्रत्येक हृदयामध्ये स्थित असतो; परंतु तो सर्वव्यापी नसतो. आत्मा आणि परमात्म्यामध्ये हाच भेद आहे. जो वास्तविकपणे योगाभ्यास करीत नाही तो हे पाहू शकत नाही. कृष्णभावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांना श्रद्धायुक्त आणि श्रद्धाहीन दोन्ही प्रकारच्या मनुष्यांमध्ये पाहू शकतो. स्मृतीमध्ये याला पुढीलप्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे. आततत्वाचा मातृत्वाचा आत्मा हि परमो हरि: भगवंत हे सर्व जीवांचे उगमस्थान असल्यामुळे ते पालनकर्ता आणि मातेप्रमाणे आहेत. ज्याप्रमाणे माता सर्व मुलांशी समानतेने वागते त्याचप्रमाणे परमपिता (किंवा माता) भगवंतही समानतेने वागतात. म्हणून परमात्मा प्रत्येक जीवामध्ये नित्य वास करतो.

          बाह्यतः सुद्धा प्रत्येक जीव भगवंतांच्या शक्तीमध्ये स्थित आहे. सातव्या अध्यायामध्ये सांगितले जाईल, की मुख्यत: भगवंतांच्या आध्यात्मिक किंवा परा आणि भौतिक किंवा अपरा या दोन शक्ती आहेत. जीव जरी आध्यात्मिक शक्तीचे अंश असले तरी ते भौतिक शक्तीद्वारे बद्ध होतात. याप्रमाणे जीव हे सदैव भगवंतांच्या शक्तीतच स्थित असतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक जीव हा भगवंतांमध्ये स्थित आहे.

योगी सर्वांकडे समदृष्टीने पाहतो, कारण त्याला माहीत असते की, सर्व जीव आपापल्या कर्मफलांनुसार विविध अवस्थांमध्ये असले, तरी ते सदासर्वदा भगवंतांचे सेवकच असतात. जेव्हा जीव भौतिक शक्तीत असतात तेव्हा ते भौतिक इंद्रियांची सेवा करतात आणि जेव्हा ते आध्यात्मिक शक्तीत असतात तेव्हा ते भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करतात. कोणत्याही दशेमध्ये जीव हा परमेश्वराचा सेवकच असतो. ही समदृष्टी कृष्णभावनाभावित व्यक्तीकडे पूर्णपणे असते.

« Previous Next »