No edit permissions for मराठी

TEXT 38

kaccin nobhaya-vibhraṣṭaś
chinnābhram iva naśyati
apratiṣṭho mahā-bāho
vimūḍho brahmaṇaḥ pathi

कचित्-की काय; -नाही; उभय-दोन्ही; विभ्रष्ट:-भ्रष्ट, छिन्न-छिन्नविच्छिन्न किंवा फुटलेल्या; अभ्रम्—ढग; इव—प्रमाणे; नश्यति—नष्ट होतो; अप्रतिष्ठः—स्थिर न झालेला; महाबाहो-हे महाबाहो कृष्ण; विमूढः-मोहग्रस्त; ब्रह्मण:-ब्रह्मप्राप्ती; पथि-मार्गावर किंवा पथावर.

हे महाबाहो कृष्ण! ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्नविच्छित्र ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना?

तात्पर्य: उन्नतीचे दोन मार्ग आहेत. जे भौतिकवादी आहेत त्यांना अध्यात्मामध्ये मुळीच रुची नसते, म्हणून ते आर्थिक विकासाद्वारे भौतिक प्रगती करण्यास उत्सुक असतात किंवा सकाम कर्माद्वारे उच्चतर लोकांची प्राप्ती करण्यास उत्सुक असतात. जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला सर्व भौतिक कर्माचा आणि सर्व प्रकारच्या तथाकथित भौतिक सुखांचा त्याग करणे आवश्यक आहे. जर महत्वाकांक्षी योगी अपयशी झाला तर तो वरकरणी दोन्ही दृष्ट्या गमावतो, अर्थात तो भौतिक सुखाचाही भोग घेऊ शकत नाही किंवा आध्यात्मिक यशप्राप्तीचा आनंदही उपभोगू शकत नाही. त्याला कोणतेही स्थान नसते आणि तो एखाद्या छिन्नविच्छित्र ढगाप्रमाणे असतो. आकाशामधील एक ढग कधीकधी लहान ढगापासून सुटतो आणि मोठ्या ढगाला जाऊन मिळतो, परंतु जर हा ढग मोठ्या ढगाला मिळू शकला नाही, तर तो वा-याने वाहून जातो आणि अनंत आकाशात अस्तित्वहीन होतो. ब्रह्मणः पथि हा आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे आणि हा साक्षात्कार मनुष्याने आपण स्वरूपतः आध्यात्मिक आहोत आणि ब्रह्म, परमात्मा व भगवान या स्वरूपात प्रकट होणा-या भगवंतांचे अंश आहोत, हे जाणल्याने होतो. भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत आणि म्हणून जो परमपुरुषाला शरण जातो तोच यशस्वी योगी होय. ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्काराद्वारे या जीवनध्येयाची प्राप्ती करण्यासाठी अनेकानेक जन्म घ्यावे लागतात. (बहुनां जन्मनामन्ते) म्हणून दिव्य साक्षात्काराचा प्रत्यक्ष आणि परमश्रेष्ठ मार्ग म्हणजे भक्तियोग किंवा कृष्णभावना होय.

« Previous Next »