No edit permissions for मराठी

TEXT 39

etan me saṁśayaṁ kṛṣṇa
chettum arhasy aśeṣataḥ
tvad-anyaḥ saṁśayasyāsya
chettā na hy upapadyate

एतत्-हा आहे; मे-माझा; संशयम्-संशय; कृष्ण-हे कृष्ण; छेत्तुम्-दूर करण्यासाठी; अहसि-तुम्हाला विनंती आहे; अशेषतः-पूर्णपणे; त्वत्-तुमच्याविना; अन्यः-इतर; संशयस्य-संशयाचा; अस्य-हा; छेत्ता-निरसन करणारा; -कधीच नाही; हि-निश्चितच; उपपद्यते-मिळणे शक्य आहे.

हे कृष्ण! माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्यावाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही.

तात्पर्य: श्रीकृष्ण हे त्रिकालज्ञ आहेत. त्यांना भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांचे पूर्ण ज्ञान असते. भगवद्गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, भूतकाळामध्ये सर्व जीवांचे स्वतंत्र अस्तित्व होते, वर्तमान काळातही सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक जंजाळातून मुक्त झाल्यावरही, सर्व जीव भविष्यकाळात वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच. म्हणून भगवंतांनी जीवांच्या भविष्याच्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे. आता, अर्जुनाला अयशस्वी योग्याच्या भविष्याबद्दल जाणून घ्यावयाचे आहे. श्रीकृष्णांच्या समान किंवा बरोबरीचा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांची बरोबरी करू शकत नाहीत. म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयांचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे, कारण ते भूत, वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात; परंतु त्यांना कोणी जाणत नाहीत. केवळ श्रीकृष्ण आणि कृष्णभावनाभावित भक्त हेच सर्व काही इत्थंभूत जाणू शकतात.

« Previous Next »