No edit permissions for मराठी

TEXT 12

sarva-dvārāṇi saṁyamya
mano hṛdi nirudhya ca
mūrdhny ādhāyātmanaḥ prāṇam
āsthito yoga-dhāraṇām

सर्व-द्वाराणि-शरीराची सर्व द्वारे; संयम्य-संयमित करून; मनः—मन; हृदि-हृदयामध्ये; निरुध्य-रोधून किंवा रोखून;-सुद्धा; मूर्ध्नि-मस्तकावर; आधाय-स्थिर करून; आत्मन:- आत्म्याचे; प्राणम्-प्राणवायू; आस्थितः-मध्ये स्थित झालेला; योग-धारणाम्-योगावस्था किंवा योगधारणा.

सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून, मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो.

तात्पर्य: या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करण्याकरिता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रियोपभोगांची द्वारे बंद करावी लागतात. हा अभ्यास म्हणजेच प्रत्याहार अर्थात ज्ञानेंद्रिये पूर्णपणे संयमित केली पाहिजेत आणि त्यांना इंद्रियभोगात युक्त होऊ देता कामा नये. या प्रकारे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते आणि प्राणाचे मस्तकापर्यंत उर्ध्वारोहण होते. सहाव्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे. तथापि, पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही. सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्णभावना आहे. जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णांवर एकाग्र केले तर त्याला समाधिस्थ होणे अत्यंत सुलभ होते.

« Previous Next »