TEXT 20
paras tasmāt tu bhāvo ’nyo
’vyakto ’vyaktāt sanātanaḥ
yaḥ sa sarveṣu bhūteṣu
naśyatsu na vinaśyati
परः-श्रेष्ठ; तस्मात्-त्याहून; तु—परंतुः भावः-प्रकृती; अन्यः-अन्य; अव्यक्तः-अव्यक्त अव्यक्तात्-अव्यक्तातूनः सनातनः-शाश्वत; यः सः-ते जे; सर्वेषु-सर्वं; भूतेषु-व्यक्त; नश्यत्सु-नाहीशी झाली तरीही; न-कधीच नाही; विनश्यति-विनाश होतो.
याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही.
तात्पर्य: श्रीकृष्णांची श्रेष्ठ, आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. ही आध्यात्मिक शक्ती, ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणा-या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे. गुणात्मकदृष्ट्या श्रीकृष्णांची परा शक्ती ही अपरा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे. परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन सातव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे.