No edit permissions for मराठी

TEXT 5

anta-kāle ca mām eva
smaran muktvā kalevaram
yaḥ prayāti sa mad-bhāvaṁ
yāti nāsty atra saṁśayaḥ

अन्त-काले-अंतकाळी; -सुद्धा; माम्-मला; एव-खचितच; स्मरन्-स्मरण करीत; मुक्त्वा-त्याग करून; कलेवरम्-शरीर; यः-जो; प्रयाति-प्रयाण करतो; सः-तो; मत्भावम्-माझी प्रकृती; याति-प्राप्त करतो; -नाही; अस्ति-आहे; अत्र-यात; संशयः-संशय.

आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो, तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो. यात मुळीच संशय नाही.

तात्पर्य: या श्लोकामध्ये कृष्णभावनेच्या महत्तेवर जोर देण्यात आला आहे. कृष्णभावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची तात्काळ प्राप्ती होते. भगवंत हे विशुद्धाहूनही विशुद्ध आहेत आणि म्हणून जो कोणी कृष्णभावनाभावित असतो तो सुद्धा विशुद्धाहून विशुद्ध असतो. या श्लोकातील स्मरन हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्याने कृष्णभावनाभावित भक्तियोगाचे आचरण केलेले नाही, त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य नाही. म्हणून कृष्णभावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे. अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करावयाचे असेल तर, त्यांच्यासाठी कृष्णस्मरणहे अनिवार्य आहे. म्हणून मनुष्याने सतत अविरतपणे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/ हरे राम हरे राम राम राम हरे हरे/ या महामंत्राचा जप केला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की, व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे. तरोरिव सहिष्णुना: हरे कृष्ण जप करणा-या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. तरीही, अशा सर्व संकटांना सहन करीत, मनुष्याने हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/ हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्णभावनेचा पुरेपूर लाभ होऊ शकेल.

« Previous Next »