No edit permissions for मराठी

TEXT 21

te taṁ bhuktvā svarga-lokaṁ viśālaṁ
kṣīṇe puṇye martya-lokaṁ viśanti
evaṁ trayī-dharmam anuprapannā
gatāgataṁ kāma-kāmā labhante

ते-ते; तम्-त्या; भुक्त्वा-उपभोग घेऊन; स्वर्ग-लोकम्-स्वर्गलोक; विशालम्-विशाल; क्षीणे-क्षीण झाल्यानंतर; पुण्ये-पुण्यकर्माची फळे; र्त्य-लोकम्-मत्र्यलोकावर, या पृथ्वीवर; विशन्ति—पतन पावतात; एवम्-याप्रमाणे; त्रयी—तीन वेदांचे; धर्मम्-सिद्धांत; अनुप्रपन्नाः-पालन करून; गत-आगतम्-जन्म आणि मृत्यू; काम-कामाः-इंद्रियभोगाची इच्छा करणारे; लभन्ते-प्राप्त होतात.

याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषयसुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्युलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे (सिद्धांताचे) पालन करून जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात, त्यांना पुनः पुन्हा केवळ जन्म-मृत्यूच्या चक्रात पडावे लागते.

तात्पर्य: जो उच्चतर लोकाप्रत उन्नत होतो तो दीर्घायुष्य उपभोगतो आणि इंद्रियतृप्ती करण्यासाठी त्याला अधिक उत्तम प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध होतात; पण तरीही त्याला उच्चतर लोकामध्ये कायमचे राहू दिले जात नाही. मनुष्याच्या पुण्यकर्माची फळे जेव्हा समाप्त होतात तेव्हा मनुष्याला पुन्हा पृथ्वीतलावर परत पाठविले जाते. वेदान्त सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे (जन्माद्यस्य यतः) ज्याने ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त केली नाही किंवा दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, ज्याला, सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण यांचे ज्ञान झालेले नाही तो जीवनाचा अंतिम उद्देश प्राप्त करण्यामध्ये निष्फळ ठरतो. अशा रीतीने कधी वर तर कधी खाली करणा-या चक्रामध्ये स्थित असल्याप्रमाणे तो पुनः पुन्हा उच्चतर लोकांमध्ये जातो आणि पुनः पुन्हा परतून येतो. तात्पर्य हेच आहे की, ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परतून येण्याची मुळीच शक्यता नसते त्या वैकुंठलोकाची प्राप्ती करण्याऐवजी मनुष्य केवळ स्वर्गलोकामध्ये आणि मृत्युलोकामध्ये पुनः पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात पडत राहतो. म्हणून सच्चिदानंदमय जीवन जगण्याकरिता आणि पुन्हा या दुःखमय संसारात कधीही न परतण्याकरिता मनुष्याने आध्यात्मिक जगताची प्राप्ती करणे हे अधिक श्रेयस्कर आहे.

« Previous Next »