No edit permissions for मराठी

TEXT 22

ananyāś cintayanto māṁ
ye janāḥ paryupāsate
teṣāṁ nityābhiyuktānāṁ
yoga-kṣemaṁ vahāmy aham

अनन्या:-अनन्य भावाने, इतर कोणताही हेतू नसणारे; चिन्तयन्तः-चिंतन करून; माम्-माझ्यावर; ये-जे; जनाः-लोक; पर्युपासते-योग्य प्रकारे उपासना करतात; तेषाम्-त्या; नित्य-नेहमी; अभियुक्तानाम्-भक्तीमध्ये दृढ झालेले; योग-आवश्यकता किंवा गरजा; क्षेमम्-रक्षण; वहामि—करतो; अहम्—मी.

परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.

तात्पर्य: कृष्णभावनेवाचून ज्याला क्षणभरही राहवत नाही तो दिवसातून चौविस तास श्रीकृष्णांचेच चिंतन करतो. तो श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य केवळ आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रममाण झालेला असतो. अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणा-या, अशा सर्व क्रिया, मंगलमयी आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात, यामुळे भगवद्‌भक्त भगवंतांचे केवळ सान्निध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो. असा हा भक्त नि:संदेह विनाप्रयास भगवत्प्राप्ती करतो. यालाच योग असे म्हणतात. भगवत्कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक बद्धावस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही. क्षेम म्हणजे भगवंतांचे अहैतुकी संरक्षण होय. योगाद्वारे कृष्णभावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला साहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्णभावनाभावित होतो तेव्हा त्याचे दुःखपूर्ण बद्धावस्थेत पतन होण्यापासून रक्षण करतात.

« Previous Next »