No edit permissions for मराठी

TEXT 23

ye ’py anya-devatā-bhaktā
yajante śraddhayānvitāḥ
te ’pi mām eva kaunteya
yajanty avidhi-pūrvakam

ये-जे; अपि-सुद्धा; अन्य-दुस-या; देवता-देवतांचे; भक्ता:-भक्त; यजन्ते-पूजन करतात; श्रद्धया अन्विता:-श्रद्धेने; ते-ते; अपि-सुद्धा; माम्-माझेच; एव-केवळ; कौन्तेय-हे कौंतेया; यजन्ति-पूजन करतात, अविधि-पूर्वकम्-अविधिपूर्वक, चुकीच्या मार्गाने.

हे कोंतेया! जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण सांगतात की, ‘‘देवतांची उपासना म्हणजे जरी अप्रत्यक्षपणे माझीच उपासना करीत असले तरी ते फार बुद्धिमान नसतात. 'उदाहरणार्थ, जेव्हा मनुष्य, वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता, वृक्षाच्या पानांना आणि फांद्यांना पाणी घालतो तेव्हा तो पुरेशा ज्ञानाच्या अभावी किंवा नियामक तत्त्वांचे पालन न करता असे करतो. त्याचप्रमाणे शरीराच्या विविध अवयवांची सेवा करणे म्हणजे पोटाला अन्नपुरवठा करणे होय. देवता या भगवंतांच्या प्रशासनातील निरनिराळ्या अधिकारी आणि निर्देशक आहेत. मनुष्याला शासनाचे नियम पाळावयाचे असतात, पदाधिकार्यांनी किंवा निर्देशकांनी केलेले नव्हे. त्याचप्रमाणे मनुष्याने केवळ भगवंतांचीच आराधना केली पाहिजे. यामुळे आपोआपच भगवंतांचे पदाधिकारी आणि निर्देशकही संतुष्ट होतील. अधिकारी किंवा निर्देशक हे प्रशासनाचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून त्यांना लाच देणे बेकायदेशीर आहे. याचेच वर्णन या ठिकाणी अविधिपूर्वकम् या शब्दामध्ये करण्यात आले आहे. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, देवतांची अनावश्यक उपासना श्रीकृष्णांना मान्य नाही.

« Previous Next »