No edit permissions for मराठी

TEXT 29

samo ’haṁ sarva-bhūteṣu
na me dveṣyo ’sti na priyaḥ
ye bhajanti tu māṁ bhaktyā
mayi te teṣu cāpy aham

समः-समभाव; अहम्-मी; सर्व-भूतेषु—सर्व जीवांच्या ठिकाणी, -कोणाचाच नाही; मे-मला; द्वेष्य:-ट्रेषपूर्ण; अस्ति-आहे; -तसेच नाही; प्रियः-प्रिय; ये-जे; भजन्ति-दिव्य सेवा करतात; तु-परंतु; माम्-माझी; भक्त्या-भक्तिभावाने; मयि-माझ्यामध्ये आहेत; ते-असे मनुष्य; तेषु-त्यांच्यामध्ये; -सुद्धा; अपि-निश्चितच; अहम्-मी.

मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे.

तात्पर्य: या ठिकाणी कोणी प्रश्न करील की, जर श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील आणि कोणीच विशेष प्रिय नसेल तर मग, त्यांची दिव्य सेवा करण्यात सदैव निमग्न असलेले भक्त त्यांना विशेष प्रिय का असतात? परंतु या ठिकाणी भेद दर्शविण्याचा संभवच नाही. हे तर साहजिकच आहे. या भौतिक जगतात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुलेबाळे विशेष प्रिय असतात. भगवंत म्हणतात की, प्रत्येक जीव मग तो कोणत्याही रूपातला असो तो माझा पुत्र आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात. भगवंत मेघासमान आहेत. मेघ हा सर्वत्र पाऊस पाडतो, मग तो खडक असो जमीन असो अथवा पाणी असो, परंतु आपल्या भक्ताकडे ते विशेष ध्यान देतात. अशा भक्तांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हे भक्त सदैव कृष्णभावनाभावित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात. 'कृष्णभावनामृत' शब्दच दर्शवितो की, जे कृष्णभावनाभावित असतात, ते भगवंतांच्या ठायी स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात. या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात की, मयि ते-ते माझ्यामध्ये स्थित आहेत. यावरून साहजिकच आहे की, भगवंतही त्यांच्यामध्ये स्थित आहेत. ही गोष्ट परस्परपूरकच आहे. यावरून ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् या श्लोकाचेही स्पष्टीकरण होते, 'जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो.' भगवंत आणि भक्त दोघेही चेतन असल्यामुळे हे अलौकिक आदानप्रदान होते. हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसविला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिच्याचेही भगवत्सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते. भगवंत हे हिन्याप्रमाणे आहेत आणि म्हणून हा मणिकांचन योग अत्यंत सुंदर दिसतो. जीवांना त्यांच्या विशुद्धावस्थेत भक्त म्हटले जाते. भगवंत हे त्यांच्या भक्तांचेही भक्त बनतात. भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्परपूरक संबंध नसेल तर ते सविशेष तत्वज्ञान असू शकत नाही. निर्विशेष तत्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीवामध्ये असे आदानप्रदान असत नाही; परंतु सविशेष तत्वज्ञानानुसार असे आदानप्रदान असते.

          याबाबतीत वारंवार उदाहरण दिले जाते की, भगवंत हे एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि मनुष्याला या कल्पवृक्षापासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवितात. तथापि, येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे. या ठिकाणी भगवंत हे आपल्या भक्ताच्या प्रति पक्षपाती असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते. भगवंत आणि भक्त यांच्यातील आदानप्रदान हे कर्म-सिद्धांताच्या अधीन असल्याचे समजू नये. असे हे आदानप्रदान दिव्य स्थितीमध्ये होते. भगवद्भक्ती ही प्राकृत जगतातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहे.

« Previous Next »