No edit permissions for मराठी

TEXT 9

na ca māṁ tāni karmāṇi
nibadhnanti dhanañ-jaya
udāsīna-vad āsīnam
asaktaṁ teṣu karmasu

-कधीच नाही; -सुद्धा; माम्-मला; तानि-ते सर्व; कर्माणि-कर्मे; निबध्नन्ति-बद्ध करतात; धनञ्जय—हे धनंजयः उदासीन-वत्-तटस्थाप्रमाणे; आसीनम्-स्थित; असक्तम्- आसक्तीरहित; तेषु-त्या; कर्मसु-कर्मामध्ये.

हे धनंजया! ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो.

तात्पर्य: या संदर्भात मनुष्याने समजू नये की, भगवंत निष्क्रिय आहेत. आपल्या आध्यात्मिक जगतात ते सदैव कार्यमग्न असतात. ब्रह्मसंहितेत (५.६) सांगण्यात आले आहे की, आत्मारामस्य तस्यास्ति प्रकृत्या न समागम:-ते आपल्या सच्चिदानंद क्रियांमध्ये नित्य युक्त असतात, परंतु या भौतिक क्रियांशी त्यांना काहीच कर्तव्य नसते. भौतिक कार्ये ही त्यांच्या विविध शक्तींद्वारे केली जातात. सृष्ट जगताच्या कार्यांच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात. या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीन-वत्‌ या शब्दांमध्ये करण्यात आला आहे. भौतिक कार्याच्या बारीक तपशिलावरही त्यांचे नियंत्रण असले तरी ते उदासीनासारखेच राहतात. या बाबतीत उच्च न्यायालयामध्ये आपल्या आसनावर बसलेल्या न्यायाधीशाचे उदाहरण देता येते. न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडत असतात, कोणाला फाशी दिली जाते. कोणाला तुरुंगवास दिला जातो, कोणाला अमाप संपत्ती दिली जाते; परंतु तरीही न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो. त्याला कोणाही व्यक्तीच्या लाभ आणि हानीशी मुळीच कर्तव्य नसते. त्याचप्रमाणे भगवंतांचा हस्तक्षेप सर्व क्रियांमध्ये असून देखील ते तटस्थ भूमिका निभावतात. वेदान्त सूत्रांमध्ये सांगण्यात आले आहे की, वैषम्यानेंधृण्ये न-भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात. ते द्वंद्वातीत आहेत. तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते आस नसतात. जीव आपापल्या पूर्वकर्मानुसार विविध योनींमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत.

« Previous Next »