No edit permissions for मराठी

TEXT 29

anantaś cāsmi nāgānāṁ
varuṇo yādasām aham
pitṝṇām aryamā cāsmi
yamaḥ saṁyamatām aham

अनन्तः-अनंत;-सुद्धा; अस्मि-मी आहे; नागानाम्-सर्व नागांमध्ये; वरुण:-वरुणदेव; यादसाम-सर्व जलचरांमध्ये; अहम्-मी आहे; पितृणाम्-पितरांमध्ये; अर्यमा-अर्यमा; - सुद्धा; अस्मि-मी आहे; यमः-यमदेव; संयमताम्-सर्व नियंत्रकांमध्ये; अहम्-मी आहे.

नागांमध्ये अनंत मी आहे आणि जलचरांमध्ये मी वरुण आहे. पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणा-यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे.

तात्पर्य: सर्व नागांमध्ये अनंतनाग सर्वश्रेष्ठ आहे आणि जलचरांमध्ये वरुणदेव सर्वश्रेष्ठ आहे. हे दोघेही श्रीकृष्णांचे प्रतीक आहेत. पितृलोकांचा अधिष्ठाता असलेला अर्यमा हा श्रीकृष्णांचाच प्रतिनिधी आहे. दुष्टांना शासन करणारे अनेक जीव आहेत आणि त्यांमध्ये यमदेव प्रमुख आहे. या पृथ्वीच्या जवळच असणा-या ग्रहलोकात यमदेव राहतो. जे पापी आहेत, त्यांना मृत्यूनंतर तेथे नेले जाते आणि यमराज त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा देण्याची व्यवस्था करतो.

« Previous Next »