No edit permissions for मराठी

TEXT 30

prahlādaś cāsmi daityānāṁ
kālaḥ kalayatām aham
mṛgāṇāṁ ca mṛgendro ’haṁ
vainateyaś ca pakṣiṇām

प्रह्लाद:- प्रह्लाद; -सुद्धा; अस्मि-मी आहे; दैत्यानाम्-दैत्यांमध्ये; काल:-काळ; कलयताम्-नियंत्रण करणायांमध्ये; अहम-मी आहे; मृगाणाम्-पशृंमध्ये; -आणि; मृगइन्द्रः-सिंह; अहम्-मी आहे; वैनतेय:- गरुड; -सुद्धा; पक्षिणाम्-पक्ष्यांमध्ये

दैत्यांमध्ये भक्तराज प्रह्लाद मी आहे, दमन करणा-यांमध्ये काळ मी आहे, पशूमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे.

तात्पर्य: दिती आणि अदिती या दोन भगिनी आहेत. अदितीपुत्रांना आदित्य तर दितीपुत्रांना दैत्य असे म्हटले जाते. सर्व आदित्य हे भगवंतांचे भक्त आहेत आणि दैत्य हे नास्तिक आहेत. प्रहादाचा जन्म जरी दैत्यकुळामध्ये झाला होता तरी तो बालपणापासून महान भगवद्भक्त होता. त्याला आपल्या भक्तीमुळे आणि दैवी गुणांमुळे श्रीकृष्णांचा प्रतिनिधी मानण्यात येते.

नियंत्रक तत्वे अनेक आहेत; परंतु काळाच्या ओघामध्ये भौतिक विश्वातील प्रत्येक वस्तूचा -हास होतो. म्हणून काळ हा श्रीकृष्णांचे रूप आहे. अनेक प्राण्यांमध्ये सिंह हा अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर पशू आहे व पक्ष्यांच्या लाखो प्रकारांत विष्णुवाहन गरुड हा सर्वांत मोठा पक्षी आहे.

« Previous Next »