No edit permissions for मराठी

TEXT 34

mṛtyuḥ sarva-haraś cāham
udbhavaś ca bhaviṣyatām
kīrtiḥ śrīr vāk ca nārīṇāṁ
smṛtir medhā dhṛtiḥ kṣamā

मृत्युः-मृत्यू; सर्व-हरः-सर्व हरण किंवा भक्षण करणारा;-सुद्धा; अहम्-मी आहे; उद्रव:- उद्भव किंवा उत्पत्ती; -सुद्धा; भविष्यताम्—भविष्यकालीन; कीर्तिः-कीर्ती; श्रीः-ऐश्वर्य किंवा सौंदर्य, वाक्-मधुर वाणी; -सुद्धा; नारीणाम्-स्त्रियांमध्ये; स्मृति:-स्मृती; मेधा  बुद्धी; धृति:-दृढता; क्षमा-क्षमा.

सर्वहरण करणारा मृत्यूमी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणा-या प्रत्येक वस्तूचे कारणही मीच आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर्य, मधुर वाणी, स्मृती, बुद्धी, दूढता आणि क्षमा मी आहे.

तात्पर्य: जन्मापासूनच मनुष्य क्षणोक्षणी मरत असतो. मृत्यू हा क्षणोक्षणी प्रत्येक जीवाचे भक्षण करीत असतो; परंतु शेवटच्या प्रहाराला मृत्यू असे म्हणतात. मृत्यू म्हणजे श्रीकृष्ण आहेत. शरीराची वाढ होताना सर्व जीवांमध्ये सहा प्रकारचे बदल होतात; त्यांचा जन्म होतो, वाढ होते, काही काळासाठी अस्तित्वात राहतात, उपफले निर्माण करतात, क्षीण होतात आणि शेवटी त्यांचा विनाश होतो. या सहा स्थित्यंतरांपैकी गर्भातून बाहेर येणे हा पहिला बदल म्हणजे श्रीकृष्ण आहेत. जन्मापासूनच सर्व भावी क्रियांचा प्रारंभ होतो.

          या ठिकाणी उल्लेख केलेल्या कीर्ती, भाग्य, मधुर वाणी, स्मृती, बुद्धी, निष्ठा आणि क्षमा या सात ऐश्वर्यांना स्त्रीवाचक मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीकडे ही सर्व किंवा त्यांपैकी काही ऐश्वर्ये असली तर त्याला स्तुत्य समजले जाते. जर एखादा मनुष्य सदाचारी असेल तर तो स्तुत्य बनतो. संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे आणि म्हणून अत्यंत कीर्तिमान आहे. एखाद्या विषयाचे अध्ययन केल्यावर जर मनुष्याला त्या विषयाचे स्मरण होऊ शकत असेल तर त्याला उत्तम स्मृतीचे वरदान लाभलेले असते. निरनिराळ्या विषयांवरील अनेक पुस्तके केवळ वाचण्याचीच योग्यता नव्हे तर ती जाणून घेणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार जीवनात उतरविणे म्हणजेच बुद्धी (मेध) होय. अस्थिरतेवर विजय प्राप्त करणे म्हणजेच दृढता होय. जेव्हा पूर्णपणे योग्य झाल्यावरही मनुष्य विनम्र आणि शांत असतो आणि जेव्हा तो सुखदुःखामध्ये स्थिर असतो तेव्हा त्याच्याकडे असणा-या ऐश्वर्याला क्षमा असे म्हटले जाते.

« Previous Next »