No edit permissions for मराठी

TEXT 16

aneka-bāhūdara-vaktra-netraṁ
paśyāmi tvāṁ sarvato ’nanta-rūpam
nāntaṁ na madhyaṁ na punas tavādiṁ
paśyāmi viśveśvara viśva-rūpa

अनेक—अनेक; बाहु—हात; उदर—उदर; वक्त्र—मुख; नेत्रम्—नेत्रः पश्यामि—मी पाहतो; त्वाम्-तुम्हाला; सर्वतः-सर्व बाजूंनी; अनन्त-रूपम्-अनंतरूप; न अन्तम्-अंत नाही; मध्यम्-मध्य नाही; न पुन:-पुन्हा नाही; तव-तुमचे; आदिम्-आदी; पश्यमि-मी पाहतो; विश्व-ईश्वर-हे विश्वेश्वर, विश्व-रूप-विश्वरूप,

हे विश्वेश्वर! हे विश्वरूप! तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या, असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही.

तात्पर्य : श्रीकृष्ण हे अनंत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत यास्तव त्यांच्या ठायी सर्वच दिसत होते.

« Previous Next »