No edit permissions for मराठी

TEXT 21

amī hi tvāṁ sura-saṅghā viśanti
kecid bhītāḥ prāñjalayo gṛṇanti
svastīty uktvā maharṣi-siddha-saṅghāḥ
stuvanti tvāṁ stutibhiḥ puṣkalābhiḥ

अमी-ते सर्व, हि-निश्चितच; त्वाम्—तुम्हाला; सुर-सङ्घाः--देवतागण; विशन्ति-प्रवेश करीत आहेत; केचित्-त्यांच्यापैकी काही; भीताः-भयभीत;प्राङ्मलय:-हात जोडून; गृणान्ति-प्रार्थना करीत आहे; स्वस्ति-शांती; इति-याप्रमाणे; उक्त्वा-बोलून; महा-ऋषि-महर्षी; सिद्धसङ्घः-सिद्धगण; स्तुवन्ति-स्तुती करीत आहेत; त्वाम्-तुम्हाला; स्तुतिभिः-स्तोत्रांनी; पुष्कलाभिः-वैदिक मंत्र किंवा स्तोत्र.

सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षिगण आणि सिद्धगण 'स्वस्ति' (शांती) असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत.

तात्पर्यः सर्व भुवनातील देवदेवता विश्वरूपाच्या भयंकर रूपाने आणि प्रखर तेजाने भयभीत झाल्या आहेत आणि म्हणून रक्षणार्थ ते भगवंतांची प्रार्थना करीत आहेत.

« Previous Next »