No edit permissions for मराठी

TEXTS 26-27

amī ca tvāṁ dhṛtarāṣṭrasya putrāḥ
sarve sahaivāvani-pāla-saṅghaiḥ
bhīṣmo droṇaḥ sūta-putras tathāsau
sahāsmadīyair api yodha-mukhyaiḥ

vaktrāṇi te tvaramāṇā viśanti
daṁṣṭrā-karālāni bhayānakāni
kecid vilagnā daśanāntareṣu
sandṛśyante cūrṇitair uttamāṅgaiḥ

अमी-ही; -सुद्धा; त्वाम्-तुमच्यामध्ये; धृतराष्ट्रस्य-धृतराष्ट्राचे; पुत्रा:-पुत्र; सर्वे-सर्व; सह-सहित; एव-खचित; अवनि-पाल-योद्धा राजांचे; सङ्कैः-संघ; भीष्मः-भीष्मदेव; द्रोणः-द्रोणाचार्य; सूत-पुत्रः-कर्णः; तथा-तथा; असौ-हा; सह-सहित; अस्मदीयैःआमच्या बाजूचे; अपि-सुद्धा; योध-मुख्यैः-मुख्य योद्धे; वक्त्राणि-मुखे; ते-तुमचे; त्वरमाणाः-त्वरेने; विशन्ति-प्रवेश करीत आहेत; दंष्ट्रा-दात; करालानि-अक्राळविक्राळ; भयानकानि-भयानक; केचित्-त्यांपैकी काहीजण; विलग्नाः-अडकलेले; दशन-अन्तरेषुदातांमध्ये; सन्दृश्यन्ते-दिसत आहेत; चूर्णतैः-चुराडा झालेले; उत्तम-अङ्गैः-शिर.

स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र, भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काहीजण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे.

तात्पर्य: पूर्वीच्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला, तो जे काही पाहण्यास इच्छुक आहे . ते दाखविण्याचे वचन दिले होते. आता अर्जुन पाहात आहे की, विरुद्ध पक्षातील प्रमुख सेनानी (भीष्म, द्रोण, कर्ण आणि सर्व धृतराष्ट्रपुत्र) व त्यांचे सैन्य आणि अर्जुनाचे स्वतःचे सैन्य या सर्वांचा संहार होत आहे. यावरून दर्शविले जाते की, कुरुक्षेत्री जमलेल्या जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुन विजयी होईल. अपराजित समजल्या जाणा-या भीष्मदेवांचाही संहार होणार असल्याचा उल्लेख या श्लोकात आढळतो. त्याचप्रमाणे कर्णाचाही संहार होणार आहे. केवळ विरुद्धपक्षीय भीष्मांसारख्या महान योद्धांचाच संहार होणार आहे असे नाही तर अर्जुनाच्या पक्षातील काही महान योद्धयांचाही विनाश होणार आहे.

« Previous Next »