No edit permissions for मराठी
TEXT 29
yathā pradīptaṁ jvalanaṁ pataṅgā
viśanti nāśāya samṛddha-vegāḥ
tathaiva nāśāya viśanti lokās
tavāpi vaktrāṇi samṛddha-vegāḥ
यथा-ज्याप्रमाणे; प्रदीप्तम्-प्रदीप्त; ज्वलनम्-अग्नी; पतङ्गाः—पतंग, कीटक; विशन्ति— प्रवेश करतात; नाशाय-नाशाकरिता; समृद्ध-पूर्ण; वेगाः-वेगाने; तथा एव-त्याप्रमाणे; नाशाय-नाशाकरिता; विशन्ति-प्रवेश करीत आहेत; लोकाः-हे सर्व लोक; तव-तुमच्या; अपि-सुद्धा; वक्त्राणि-मुखे; समृद्ध-वेगाः-मोठ्या वेगाने.
ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुतगतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहात आहे.