No edit permissions for मराठी

TEXT 32

śrī-bhagavān uvāca
kālo ’smi loka-kṣaya-kṛt pravṛddho
lokān samāhartum iha pravṛttaḥ
ṛte ’pi tvāṁ na bhaviṣyanti sarve
ye ’vasthitāḥ praty-anīkeṣu yodhāḥ

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; काल:-काळ; अस्मि-मी आहे; लोक-जगताचा; क्षय-कृत्—नाश किंवा क्षय करणारा; प्रवृद्धः—महान; लोकान्—सर्व लोक; समाहर्नुम्—संहार करण्यामध्ये; इह-या जगतामध्ये; प्रवृत्तः-प्रवृत्त; ऋते-व्यतिरिक्त; अपि-जरी; त्वाम्-तुम्ही; -कधीच नाही; भविष्यन्ति—होतील; सर्वे-सर्व; ये-जो; अवस्थिताः-स्थित; प्रतिअनीकेषु-विपक्षी; योधाः-योद्धे.

श्रीभगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्याव्यतिरिक्त (पांडवांव्यतिरिक्त) दोन्ही सैन्यांतील सर्व योद्धांचा विनाश होणार आहे.

तात्पर्य: श्रीकृष्ण हे आपला मित्र आणि स्वयं भगवान आहेत हे जरी अर्जुनाला माहीत होते तरी श्रीकृष्णांनी प्रकट केलेल्या विविध रूपांमुळे तो गोंधळून गेला. म्हणून तो पुढे विचारतो की, या प्रलयकारी शक्तीचे वास्तविक प्रयोजन काय आहे. वेदांमध्ये सांगितले आहे की, परम सत्य हे ब्राह्मणांसहित सर्वांचा संहार करते. कठोपनिषदात (१.२,२५) सांगितल्याप्रमाणे,

यस्य ब्रह्म च क्षत्रं च उभे भवत ओदन:।
मृत्यर्यस्योपसेचनं क इत्था वेद यत्र सः //

          अखेरीस सर्व ब्राह्मण, क्षत्रिय व इतर सर्वजण भोजनाप्रमाणे भगवंतांद्वारे भक्षिले जातात. भगवंतांचे हे रूप सर्वभक्षी राक्षसाप्रमाणे आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःला त्या सर्वभक्षक काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत करतात. पांडवांव्यतिरिक्त युद्धभूमीवरील उपस्थित असणार्या प्रत्येकाचा भगवंतांकडून संहार होणार होता.युद्ध करण्यास अर्जुन अनुकूल नव्हता आणि युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते, कारण यामुळे निराशा तरी वाटणार नव्हती. याला उत्तर म्हणून भगवंत सांगतात की, 'तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्यापैकी प्रत्येकाचा नाश होणार आहे, कारण ही माझी योजना आहे. 'जर अर्जुनाने युद्ध थांबविले असते तर त्यांचा मृत्यूअन्य प्रकारे होणार होता. जरी त्याने युद्ध केले नाही तरी मृत्यूला अडविणे शक्य नव्हते. वास्तविकपणे त्यांचा मृत्यू आधीच झाला होता. काळ हा संहारक आहे आणि सर्व अभिव्यक्तींचा भगवंतांच्या इच्छेने विनाश होणार आहे. हाच प्रकृतीचा नियम आहे.

« Previous Next »