No edit permissions for मराठी

TEXT 38

tvam ādi-devaḥ puruṣaḥ purāṇas
tvam asya viśvasya paraṁ nidhānam
vettāsi vedyaṁ ca paraṁ ca dhāma
tvayā tataṁ viśvam ananta-rūpa

त्वम्—तुम्ही; आदि-देवः-आदिदेव, परमेश्वरः पुरुषः-पुरुषः पुराणः-पुरातन; त्वम्-तुम्ही; अस्य-या; विश्वस्य-विश्वः परम्—परम; निधानम्-आश्रय; वेत्ता-ज्ञाताः असि-आहात; वेद्यम्-ज्ञेयः -आणिः परम्-परम, दिव्य; -आणिः; धाम-धाम; त्वया-तुमच्याकडून; ततम्—व्याप्त; विश्वम्—विश्वः अनन्तरूप—हे अनंतरूप.

तुम्ही आदिपुरुष भगवान, पुरातन, या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंतरूपा तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे.

तात्पर्यः सर्व काही भगवंतांवरच आश्रित आहे म्हणून ते परम आश्रय आहेत. निधानम् म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योतीसहित सर्व काही भगवान श्रीकृष्णांवरच आश्रित आहे. या जगतामध्ये घडत असणा-या घटनांचे ते ज्ञाता आहेत आणि जर ज्ञानाला अंत असेल तर तेच सर्व ज्ञानांचा अंत आहेत आणि म्हणून तेच ज्ञेय आणि ज्ञाताही आहेत. ज्ञानाचे ध्येयही तेच आहेत, कारण ते सर्वव्यापी आहेत. वैकुंठ जगताचेही कारण तेच असल्यामुळे ते दिव्य आहेत. दिव्य जगतातील परमपुरुषही तेच आहेत.

« Previous Next »