No edit permissions for मराठी

TEXT 40

namaḥ purastād atha pṛṣṭhatas te
namo ’stu te sarvata eva sarva
ananta-vīryāmita-vikramas tvaṁ
sarvaṁ samāpnoṣi tato ’si sarvaḥ

नमः-नमस्कारः पुरस्तात्-पुढून; अथ-सुद्धा; पृष्ठतः-पाठीमागून; ते-तुम्हाला; नमः अस्तुमी नमस्कार करतो; ते-तुम्हाला; सर्वतः-सर्व बाजूंनी; एव-खचितच; सर्व-कारण तुम्हीच सर्व काही आहात; अनन्त-वीर्य-अनंतवीर्य किंवा अपार शक्ती; अमित-विक्रमः-असीम बळ; त्वम्‌-तुम्ही; सर्वम्-सर्व; समाप्नोषि-तुम्ही आवृत्त करता; ततः-म्हणून; असि-तुम्ही आहात; सर्वः-सर्व.

तुम्हाला पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो. हे अनंतवीर्य तुम्ही अपारशक्तीचे स्वामी आहात, तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात.

तात्पर्य: श्रीकृष्णांवरील प्रेमामुळे त्यांचा मित्र अर्जुन त्यांना सर्व बाजूंनी प्रणाम करीत आहे. अर्जुन असे मानतो की, श्रीकृष्ण हे सर्व शक्तीचे आणि बलांचे स्वामी आहेत आणि युद्धभूमीवर जमलेल्या सर्व मोठमोठ्या योद्धयांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. विष्णुपुराणामध्ये (१.९.६९) म्हटले आहे की,

योऽयं तवतो देव समीपं  देवतागण:।
स त्वमेव जगत्स्रष्टं यतः सर्वगतो भवान्‌ ।।

हे भगवन्! तुमच्या समक्ष जो कोणी येतो, मग ते देवदेवता का असेना, त्याला तुम्हीच निर्माण केले आहे.

« Previous Next »