No edit permissions for मराठी

TEXT 45

adṛṣṭa-pūrvaṁ hṛṣito ’smi dṛṣṭvā
bhayena ca pravyathitaṁ mano me
tad eva me darśaya deva rūpaṁ
prasīda deveśa jagan-nivāsa

अदृष्ट-पूर्वम्-पूर्वी कधीही न पाहिलेले; हृषित:-हर्षित; अस्मि-मी आहे; दृष्ट्वा -पाहून; भयेन-भयाने; -सुद्धा; प्रव्यथितम्-व्याकूळ झाले आहे; मनः-मन; मे-माझे; तत्-ते; एव-निश्चितच; मे-मला, दर्शय-दाखवा, देव-हे प्रभू ; रूपम्-रूप; प्रसीद-प्रसन्न; देवईश—हे देवाधिदेव; जगत्-निवास—हे जगन्निवास,

पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे; परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकूळ झाले आहे. म्हणून हे देवाधिदेव, हे जगत्रिवास! कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा.

तात्पर्य: अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत निकटवर्ती सखा आहे. म्हणून ज्याप्रमाणे एखादा मित्र आपल्या मित्राच्या ऐश्वर्याने आनंदित होतो त्याचप्रमाणे आपला मित्र कृष्ण हा स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे आणि तो असे अद्भुत विश्वरूपही दाखवू शकतो हे पाहून अर्जुन अत्यानंदित झाला आहे; पण त्याचबरोबर हे विराट रूप पाहून झाल्यावर आपल्या निभेळ मित्रप्रेमामुळे श्रीकृष्णांप्रति केलेल्या अपराधांबद्दल त्याला भय वाटत आहे, म्हणून जरी त्याला भयभीत होण्याचे कारण नसले तरी तो भयामुळे अतिशय व्यथित झाला आहे. यास्तव अर्जुन, श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायणरूप धारण करण्याची विनंती करीत आहे कारण, श्रीकृष्ण कोणतेही रूप धारण करू शकतात. ज्याप्रमाणे हे प्राकृत जगत तात्पुरते आहे त्याचप्रमाणे हे विश्वरूपही भौतिक आणि तात्पुरते आहे. परंतु वैकुंठलोकामध्ये भगवंत दिव्य, चतुर्भुज नारायण रूपात वास करतात. आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य वैकुंठलोक आहेत आणि प्रत्येक लोकामध्ये श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपाद्वारे निरनिराळी नावे धारण करून वास करतात. या प्रकारे अर्जुनाने वैकुंठलोकातील नारायण रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली. अर्थात, प्रत्येक वैकुंठलोकामध्ये नारायण चतुर्भुज रूप धारण केलेले असतात, परंतु त्यांनी हातामध्ये निरनिराळ्या प्रकारे शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले असते. ज्या ज्या प्रकारे नारायणही शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करतात त्यानुसार भगवान नारायणांना विविध प्रकारची नावे देण्यात येतात. ही सर्व श्रीकृष्णांचीच रूपे आहेत म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचे चतुर्भुजरूप पाहण्याची इच्छा व्यक्त करतो.

« Previous Next »