No edit permissions for मराठी

TEXT 46

kirīṭinaṁ gadinaṁ cakra-hastam
icchāmi tvāṁ draṣṭum ahaṁ tathaiva
tenaiva rūpeṇa catur-bhujena
sahasra-bāho bhava viśva-mūrte

किरीटिनम्—किरीटधारी; गदिनम्—गदाधारी; चक्र-हस्तम्—चक्रधारी, इच्छामि—मी इच्छा करतो; त्वाम्-तुम्हाला; द्रष्टुम्-पाहण्याची; अहम्-मी; तथा एव-त्या स्थितीमध्ये; तेन एव-त्यामध्ये; रूपेण-रूप, चतु:-भुजेन-चतुर्भुज, सहस्त्र-बाहो-हे सहस्रबाहो; भव-हो; विश्वमूर्ते-हे विश्वमूर्ती, हे विराट रूप.

हे विश्वमूर्ते, हे सहस्रबाहो भगवान! मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख, चक्र, गदा, पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो. तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे.

तात्पर्यः ब्रह्मसंहितेत (५.३९) म्हटले आहे की, रामादिमूर्तिषु कलानियमेन तिष्ठन्—भगवंतांची शेकडो-हजारो शाश्वत रूपे आहेत आणि राम, नृसिंह, नारायण इत्यादी रूपे प्रमुख आहेत. भगवंतांची रूपे ही असंख्य आहेत. परंतु अर्जुनाला माहीत होते की, श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांनीच अनित्य विराट रूप धारण केले आहे. तो भगवंतांना दिव्य नारायण रूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे. श्रीकृष्ण हे स्वयं आदिपुरुष भगवान आहेत आणि इतर सर्व अवतारांचा त्यांच्यापासूनच उद्गम होतो या श्रीमद्भागवताच्या विधानाला या श्लोकामध्ये स्पष्ट दुजोरा देण्यात आला आहे. ते आपल्या विस्तारित रूपांपासून भिन्न नाहीत आणि असंख्य रूपांतील कोणत्याही रूपांमध्ये ते परमेश्वरच असतात. या सर्व रूपांमध्ये ते एखाद्या युवकाप्रमाणेच नवयुवक असतात (चिरतरुण), कारण तेच भगवंतांचे शाश्वत रूप आहे. जो श्रीकृष्णांना जाणतो तो भौतिक प्रकृतीच्या संसर्गातून तात्काळ मुक्त होतो.

« Previous Next »