No edit permissions for मराठी

TEXT 53

nāhaṁ vedair na tapasā
na dānena na cejyayā
śakya evaṁ-vidho draṣṭuṁ
dṛṣṭavān asi māṁ yathā

-कधीही नाही; अहम्-मी; वेदैः-वेदाध्ययनाने; -कधीही नाही; तपसा-कठोर तपश्चर्येने; -कधीही नाही; दानेन-दानाने; -कधीही नाही; -सुद्धा; इज्यया-पूजेने; शक्य:- शक्य; एवम्-विध:-याप्रमाणे; द्रष्टुम्-पाहणे; दृष्टवान्-पाहात; असि-तू आहेस; माम्-मला; यथा-ज्याप्रमाणे.

तुझ्या दिव्य चक्षूद्वारे तू जे रूप पाहात आहेस ते केवळ वेदाध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही.

तात्पर्य: सर्वप्रथम श्रीकृष्ण वसुदेव-देवकीसमोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि नंतर त्यांनी स्वतःचे रूपांतर द्विभुज रूपामध्ये केले. जे भक्तिविहीन आहेत आणि जे नास्तिक आहेत त्यांना हे रहस्य उमगणे अत्यंत कठीण आहे. ज्या विद्वानांनी केवळ विद्यार्जन करण्याकरिता किंवा व्याकरणात्मकदृष्ट्या वेदाध्ययन केले आहे ते श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. तसेच जे औपचारिकरीत्या मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी जातात ते सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. ते लोक नित्यनियमाने मंदिरास जातात; परंतु श्रीकृष्णांना यथार्थ रूपाने जाणू शकत नाहीत. पुढील श्लोकामध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तिमार्गानेच मनुष्य त्यांना जाणू शकतो.

« Previous Next »