No edit permissions for मराठी

TEXT 8

mayy eva mana ādhatsva
mayi buddhiṁ niveśaya
nivasiṣyasi mayy eva
ata ūrdhvaṁ na saṁśayaḥ

मयि-माझ्या ठायी; एव-निश्चितपणे; मनः-मन; आधत्स्व-स्थिर कर; मयि-माझ्या ठायी; बुद्धिम्-बुद्धी; निवेशय-नियुक्त कर; निवसिष्यसि-तू निवास करशील; मयि-माझ्यामध्ये; एव-निश्चितपणे; अतः ऊध्र्वम्-त्यानंतर; -कधीही नाही; संशयः-संशय, संदेह.

माझ्यावर (पुरुषोत्तम भगवंतांवर) तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निःसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील.

तात्पर्य: जो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याचा भगवंतांशी साक्षात संबंध असतो आणि म्हणून आरंभापासून तो दिव्यावस्थेमध्ये स्थित असतो यांत मुळीच संशय नाही. भक्त हा सांसारिक स्तरावर राहात नाही, तर तो श्रीकृष्णांच्या ठायी वास करतो. भगवंत आणि पवित्र हरिनाम हे अभिन्न आहेत, म्हणून जेव्हा भक्त हरेकृष्ण जप करीत असतो तेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांची अंतरंगा शक्ती भक्ताच्या जिहेवर नृत्य करीत असतात. जेव्हा तो श्रीकृष्णांना भोग अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ते खाद्यपदार्थ ग्रहण करतात आणि हा कृष्णप्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो. जो मनुष्य अशा सेवेमध्ये संलग्न होत नाही, तो हे कसे घडते यासंबंधी भगवद्गीतेत आणि वेदांमध्ये जरी निवेदन केलेले असले तरी जाणू शकत नाही.

« Previous Next »