No edit permissions for मराठी

TEXT 14

ahaṁ vaiśvānaro bhūtvā
prāṇināṁ deham āśritaḥ
prāṇāpāna-samāyuktaḥ
pacāmy annaṁ catur-vidham

अहस्रम्-मी; वैश्वानरः-जठराग्नी रूपातील माझा विस्तारित अंश; भूत्वा-होऊन; प्राणिनाम्सर्व प्राणिमात्रांच्या; देहम्-देहामध्ये; आश्रित:-स्थित आहे; प्राण-उध्वंगमन करणारा प्राणवायू: अपान-अधोगमन करणारा अपान वायू; समायुक्त:-संतुलन राखून; पचामि-मी पचन करतो; अन्नम्-अन्न; चतु-विधम्—चार प्रकारचे.

सर्व प्राणिमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो.

तात्पर्य: आयुर्वेदानुसार, जठरामध्ये अग्नी असतो आणि तो जठरातील सर्व अन्नाचे पचन करतो. जेव्हा जठराग्नी प्रदीप्त नसतो तेव्हा मनुष्याला भूक लागत नाही आणि जेव्हा तो प्रदीप्त असतो तेव्हा भूक लागते. जठराग्नी व्यवस्थितपणे कार्य करीत नाही तेव्हा उपचाराची आवश्यकता असते. कोणत्याही परिस्थितीत हा अग्नी भगवंतांचेच रूप आहे. वेदांमध्येही (बृहदारण्यक उपनिषद् ५.९.१) म्हटले आहे की, भगवंत किंवा ब्रह्म, अग्निरूपामध्ये जठरात उपस्थित आहे आणि सर्व प्रकारच्या अन्नाचे पञ्चन करीत आहे. (अयमग्निर्वैश्वानरो योऽयमन्तः पुरुषे येनेदमन्नं पच्यते) म्हणून सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करण्यास भगवंतच साहाय्य करीत असल्यामुळे खाण्याच्या बाबतीत जीवाला स्वातंत्र्य नाही. जोपर्यंत जीवाला अन्न पचन करण्यास भगवंत साहाय्य करीत नाहीत तोपर्यंत तो अन् खाण्याची शक्यताच नाही. याप्रमाणे भगवंतच अन्नपदार्थ निर्माण करतात आणि अन्नाचे पचन करतात आणि भगवंतांच्या कृपेमुळेच आपण जीवनाचा उपभोग घेतो. वेदान्त सूत्रामध्येही (१.२.२७) या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे शब्द दिभ्योऽन्तः प्रतिष्ठानाच्च-भगवंत हे ध्वनी, शरीर, वायू आणि जठरामध्ये जठराग्नीच्या रूपामध्ये उपस्थित आहेत. चव्र्य, चोष्य, लेह्य आणि पेय योग्य असे चार प्रकारचे अन्न असते आणि या सर्वांना पचविणारी पचनशक्तीही भगवंतच आहे.

« Previous Next »